Scam of Seven Hundreds Crores : पुण्यात शेकडो लोकांना गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपायांचा गंडा घातल्याचे प्रकरण गाजत आहे. या प्रकरणी गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारीनुसार चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. तर आर्थिक गुन्हे शाखेकडे शंभरहून अधिक नागरिकांनी तक्रारी दिल्या आहेत. त्यात काही पोलिसांचाही समावेश असल्याची माहिती आहे. दरम्यान, दामदुप्पटीचे आमिष दाखवून पोलिसांनाही गंडा घालणारा बाणेर रस्त्यावरील एपीएस वेल्थ व्हेंचर एलएलपी या कंपनीचा संचालक पत्नीसह फरार आहे.
आरोपी अविनाश राठोड ( Avinash Rathod) याची एपीएस वेल्थ व्हेंचर एलएलपी कंपनी पुण्यात २०११ पासून काम करीत आहे. दरम्यान त्याने गुंतवणूकदारांना दर महिन्याला मूळ रक्कमेतील पाच टक्के व पाच टक्के व्याज असा मिळून दरमहा दहा टक्के परतावा, तसेच २० महिन्यात दामदुप्पट देण्याचे आमिष दाखविले. त्याने लोकांना काही प्रमाणात परतावेही दिले. त्यातून विश्वास संपादन झाल्याने गेल्या ११ महिन्यात या कंपनीच्या माध्यमातून पुण्यासह राज्यातील अनेकांनी गुंतवणूक केल्याची माहिती आहे. या काळात जमा झालेली कोट्यवधींची रक्कम घेऊन आता राठोड फरार झाला आहे. या फसवणुकीला काही पोलिसही बळी पडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Pune Police या गुंतवणूकदारांमध्ये डॉक्टर, अभियंते, पोलिसांसह अनेक श्रीमंत नागरिकांनी लाखो रुपायंची गुंतवणूक केली आहे. गेल्या ११ महिन्याने राठोडकडे सुमारे ७०० कोटींची रक्कम जमा झाल्याची माहिती आहे. ती रक्कम घेऊन तो फरार झाला आहे.
दरम्यान, बंद कार्यालय पाहून गुंतवणूकदारांनी राठोड आणि त्याची पत्नीला वारंवार फोन केले. फोनला प्रतिसाद दिला नसल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर गुंतवणूकदारांनी पोलिसांसह आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली.
या प्रकरणी चतुःश्रृगी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडे पोलिसांसह अनेक नागारिकांनी तक्रारी दिल्या आहे. मात्र पोलिसांना आठवड्यापासून फारर राठोड व त्याच्या पत्नीचा शोध घेता आला नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Post a Comment